केळणा नदीत वाळूची चोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:05 AM2019-03-07T01:05:32+5:302019-03-07T01:05:49+5:30

जाफराबाद तालुक्यातील सावखेडा, टाकळी, शिवारातील केळणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याने नदीपात्राची चाळणी झाली आहे.

There is a steal of sand in the river Kelana | केळणा नदीत वाळूची चोरी सुरूच

केळणा नदीत वाळूची चोरी सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सावखेडा, टाकळी, शिवारातील केळणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याने नदीपात्राची चाळणी झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
पात्रात वाळू विक्रीचा परवाना नसताना जेसीबीच्या साह्याने पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्या संगनमताने सर्रास वाळू उपसा केला जात आहे.
या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे सावरखेडा येथील आत्माराम सोनवणे यांनी केली आहे.
वाळू चोरी करणाऱ्यांची मुजोरी वाढली असून आमचे कोणी काही करत नाही, अशी भाषा वापरली जात आहे. या प्रकरणी गौणखनिज कायद्यान्वये पडलेल्या खड्ड्यांचे मोजमाप करण्यात येऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.

Web Title: There is a steal of sand in the river Kelana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.