भोकरदनवर अद्यापही पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:59 AM2018-08-22T00:59:44+5:302018-08-22T01:00:03+5:30
भोकरदन तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़
यावर्षी तालुक्यात पावसाळ््याच्या सुरूवातीलाच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांची लागवड केली. त्यानंतर पिके चांगली बहरली. परंतु, पावसाने पंधरा ते वीस दिवस दडी मारल्याने पिके कोमात गेली होती. तर माळरानावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या मका, कापूस, सोयाबीन, मिरची या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील पूर्णा, केळणा, जुई, धामणा, या प्रमुख नद्या वाहिल्या नाही. त्यामुळे तालुक्यातील जुई, धामणा, पद्मावती धरणामध्ये पाणीच आले नाही. धामण कोरडेठाक आहे, तर जुई धरण सुध्दा कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, तालुक्यात मोठा पाऊस न झाल्यास पाण्याची स्थिती अत्यंत बिकट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तालुक्यात मोठ्या पावसाची नितांत गरज आहे़ भोकरदन शहरासह २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया जुई धरणाने तळ गाठल्याने शहराला पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तसेच परिसरातील २५ गावांना पाणी पुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.