राजाटाकळीत नऊ ठिकाणी चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:54 AM2018-08-22T00:54:20+5:302018-08-22T00:55:06+5:30
नसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथे सोमवारी रात्री पाच ठिकाणी चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
राजाटाकळी गावातील ज्ञानेश्वर आजेबा आर्द्रड यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोट्यांनी तीन तोळे सोने चोरी केले, गावातीलच रमेश मुदडा यांच्या किराणा दुकानचे शटर फोडून ११ हजार रोख रक्कम लंपास केली. तर सुधाकर आर्द्रड यांचे दुकान फोडून तीन हजार रोख, दत्तात्रय आर्द्रड यांच्या दुकानाचे शटर फोडून चार हजार रोख तर गावातीलच जिगना पठाण, हनुमंत आर्द्रड, रामकिशन आर्द्रड यांच्यासह आजूबाजूला असलेल्या पाच ते सहा बंद घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पो. हेकॉ. मधुकर बिक्कड यांनी घटनास्थळी पाहाणी करुन पंचनामा केला.
गावात मागील महिन्यात झालेल्या पाच चो-यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, या चो-याचा तपास लवकरात लवकर लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
राजुरात चोरट्यांनी किराणा दुकान फोडले
राजूर : येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात रोख रकमेसह पंधरा हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
येथील राजूरेश्वर मंदिराकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर मुकेश अग्रवाल यांचे गणेश किराणा दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील शटर उचकटून आत प्रवेश करून रोख चार हजार रूपये, सिगारेट पाकिटे व तेलाचे डबे असा पंधरा हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. मुकेश अग्रवाल यांनी मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती राजूर पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि. किरण बिडवे, सहायक फौजदार एकनाथ पडूळ, विष्णू बुनगे, प्रशांत लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भरचौकात चोरी झाल्याने व्यापाºयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर दुकानात यापुर्वी सुध्दा चोºया झालेल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी व्यापा-यांंतून होत आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत राजूर पोलिसांत गुन्ह्यांची नोंद झाली नव्हती.