जालन्यात चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; २८ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 10:07 AM2020-11-28T10:07:18+5:302020-11-28T10:08:02+5:30
भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे एटीएम मशीन आहे.
जालना : २८ लाखाच्या रोकडसह एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना जालना शहरातील औद्योगिक वसाहत येथे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे एटीएम मशीन आहे. शनिवारी पहाटे चोरट्यांनी एटीएम मशीन लंपास केले आहे. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढर्या रंगाच्या स्कॉर्पियोमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख २८ लाख ६७ हजार ६०० रुपये होते. या रक्कमेसह ४ लाखाचे मशीन असा ३२ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळखळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली आहे.