कैलासनगरतांडा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:22 AM2021-05-31T04:22:22+5:302021-05-31T04:22:22+5:30

आदेशाचे उल्लंघन : सात जणांवर गुन्हा जालना : शेतीच्या वादावरून पोलीस आरोपींना नोटीस देण्यास गेले असता, आरोपींनी बेकायदेशीररीत्या ...

Thieves at Kailasanagartanda | कैलासनगरतांडा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

कैलासनगरतांडा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

Next

आदेशाचे उल्लंघन : सात जणांवर गुन्हा

जालना : शेतीच्या वादावरून पोलीस आरोपींना नोटीस देण्यास गेले असता, आरोपींनी बेकायदेशीररीत्या भाडणं करून एकमेकांना मारहाण केल्याची घटना जालना तालुक्यातील गोंदेगाव येथे २८ मे रोजी घडली. याप्रकरणी पोलीस नाईक सुभाष डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून संशयित विनायक संपत वाघ, बाबासाहेब संपत वाघ, मानिक वाघ गोंविद अंबादास पाखरे, पुंजाराम पाखरे, एक महिला व शिवाजी पाखरे (सर्व रा. गोंदेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. वडते हे करीत आहेत.

एकास मारहाण : गुन्हा दाखल

जालना : किरकोळ कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील काजळा येथे घडली. याप्रकरणी सय्यद अहमेद सय्यद नूर यांच्या फिर्यादीवरून संशयित जगदीश वैजीनाथ शेळके (रा. काजळा, ता. बदनापूर) याच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोउपनी पाटील करीत आहेत.

एकास तिघांकडून मारहाण

जालना : घरासमोरील अंगणात झोपलेल्या इसमास मारहाण करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील काजळा येथे घडली. याप्रकरणी पुंजाराम गोरखनाथ करे यांच्या फिर्यादीवरून संशयित सुरजित डिंगाबर खांडेकर, संभाजी मधुकर मदनुरे, विशाल रामदास कोले (सर्व रा. काजळा) यांच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंबड येथे सावरकर जयंती साजरी

अंबड : येथील बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने तरुणांनी पुढाकार घेऊन अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते विनायक दामोधर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. नृसिंह मंदिरात अभिवादन करण्यात आले. गजानन देशमुख, वरद नाईक, विजय देशपांडे, अथर्व देशमुख, मंदार खडके, निलय जपे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Thieves at Kailasanagartanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.