मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:14 AM2019-07-21T00:14:16+5:302019-07-21T00:14:21+5:30

सिंधी बाजार भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १० हजार २०० रूपयांची रोकड लंपास केली.

Thieves in three main markets | मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

मुख्य बाजारपेठेतील तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार भागातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १० हजार २०० रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, चोरटा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जालना शहरात वाहन चोऱ्यांचे सत्र सुरू असून, चोरट्यांनी चक्क एका राष्ट्रीयकृत बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत प्रवेश केला होता. तासभर प्रयत्न करूनही तिजोरी न फुटल्याने चोरट्याने तेथून काढता पाय घेतला. चोरट्यांनी शनिवारी पहाटे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिंधी बाजार भागातील एका हॉटेलसह दोन दुकाने फोडली. विनोद अग्रवाल हे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास किराणा दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये पाहणी केली असता गल्ल्यातील १२०० रूपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. तसेच या दुकानाशेजारील संजय पैठणकर यांच्या हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या हॉटेलमधील रोख ३५०० रूपये लंपास केले. तर महेंद्र राजपूत यांचे दुकान फोडून आतील ५५०० रूपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, बाजारपेठेतील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रेस्टॉरन्ट फोडण्याचा प्रयत्न
शहरातील वीर सावरकर चौक येथे विपीन अग्रवाल यांचे बार व रेस्टॉरन्ट आहे. या रेस्टॉरन्टच्या शटरचे कुलूप तोडून, शटरच्या पट्ट्या तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

Web Title: Thieves in three main markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.