तिसरी लाट : आणखी ६० खाटांचे आयसीयू बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:49+5:302021-08-01T04:27:49+5:30

याचाच एक भाग म्हणून जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पिटलमध्ये एक आयसीयू आहे. त्यात ८० खाटा असून, आता ...

Third wave: Another 60-bed ICU will be built | तिसरी लाट : आणखी ६० खाटांचे आयसीयू बांधणार

तिसरी लाट : आणखी ६० खाटांचे आयसीयू बांधणार

Next

याचाच एक भाग म्हणून जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत कोविड हॉस्पिटलमध्ये एक आयसीयू आहे. त्यात ८० खाटा असून, आता तिसरी लाट लक्षात घेऊन यात तीन वॉर्डांत हे आयसीयू होणार आहे. त्यात एक २० खाटांचा वॉर्ड हा अमेरिकेतील एका एनजीओकडून सीएसआर निधीतून होणार आहे; तर चाळीस खाटांचे रुग्ण हे कोविड निधीतून बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता जालन्यात जाणवणार नसून, येथे स्टील उद्योगासह आता जिल्हा रुग्णालयातच दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आहेत. तसेच खासगी कंपनीकडूनही वेळप्रसंगी ऑक्सिजन मिळू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर ऑक्सिजनचे नियोजन पूर्ण आहे.

चौकट

मुलांना जपण्याचे आवाहन

तिसऱ्या लाटेत सात ते १६ या वयोटातील मुला-मुलींना अधिक जपण्याची गरज आहे. मुलांप्रमाणेच ज्येष्ठांनादेखील या लाटेचा धोका होऊ शकतो. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासह ताप, खोकला आणि अंगदुखी जाणवत असल्यास लगेचच तपासणी करून घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

- डॉ. प्रताप घोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

Web Title: Third wave: Another 60-bed ICU will be built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.