‘त्या’ संशयित आरोपींचे पोलिसांकडून स्केच जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:44 AM2019-05-28T00:44:42+5:302019-05-28T00:45:14+5:30
सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे रेखाचित्र सोमवारी जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे रेखाचित्र सोमवारी जाहीर केले.
जालना शहरातील विनय बाफना यांचे राजूर येथे सोन्याचे दुकान असून, ते त्यांचा मुलगा नवनीत यांच्यासह जालना येथून राजूरला नियमित ये-जा करतात. या ठिकाणी त्यांची सोन्या - चांदीची दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दुकान बंद करुन ते जालन्याकडे येत होते. या दरम्यान त्यांनी राजूर येथील चौफुली सोडल्यानंतर त्यांच्या कारच्या समोरुन एक तर मागच्या बाजूने एक अशा दोन कारने त्यांच्यावर पाळत ठेवली. या तिन्ही कार जवळपास वीस किमी अंतरावर आल्यानंतर घाणेवाडी फाट्याच्या शिवारातील फुलावर समोरील कारने ब्रेक लावले, तर मागच्या कारने बाफना यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली.
यावेळी स्कोडा कारमधील तीन ते चार जणांनी हातात तलवार तसेच बंदुक घेऊ विनय बाफना यांना गाडीतील ऐवज देण्याची मागणी केली. त्यांनी विरोध केल्यानंतर विनय बाफना यांच्या हातावर तलवारीने वार केले तर मुलगा नवनीत यालाही जखमी केले.
यावेळी बाफना यांच्या कारच्या काचा फोडून दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना या दरोडेखारांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी आता चार संशयितांचे स्केच जाहीर केले आहे.