हजारो विद्यार्थ्यांनी घेतला एअरो मॉडेलिंगचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:43 AM2017-12-17T00:43:38+5:302017-12-17T00:43:44+5:30
रोटरी क्लब आॅफ जालन्याच्या वतीने आयोजित रोटरी जालना एक्स्पोमध्ये शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते.
जालना: रोटरी क्लब आॅफ जालन्याच्या वतीने आयोजित रोटरी जालना एक्स्पोमध्ये शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एअरो मॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकांचा आनंद लुटला.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी आ.राजेश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मनीषा टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या शोव्दारे प्रोत्साहन घेऊन तरुणांनी वैमानिक होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन लोणीकर यांनी या वेळी केले. लहान विमान, मोठे विमान कशीे उडतात, संरक्षण दलात विमानाचे महत्त्व, ड्रोनची कार्यपदध्ती याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शोमध्ये लहान-मोठी १५ विमाने उडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जिज्ञासू विद्यार्थ्यांनी सदानंद काळे आणि कॅप्टन बाळू जहागीरदार यांना प्रश्न विचारले. विमानाची कार्यपद्धती याबद्दलही माहिती देण्यात आली. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अकलांक मिश्रीकोटकर, सचिव डॉ. दीपक बगडिया, सुनील रायठठ्ठा, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, अभय करवा, सुरेंद्र मुनोत, स्वप्नील बडजाते, अनिल छाबडा, प्रीतम लोणगावकर, संदीप तोतला, जिग्नेश शाह, भावेश पटेल, राजेंद्र भारुका, जगदीश राठी, जितेंद्र पित्ती, हेमंत ठक्कर, अभय करवा, राजेश श्रीवास्तव, समीर अग्रवाल, लता चन्ना, किशोर पंजाबी, अरुण अग्रवाल, राजेश सोनी, अभय नानावटी, महेंद्र बागडी, प्रमोद झांझरी, राहुल मिश्रीकोटकर आदींची उपस्थिती होती.
--------
एक्स्पोचा उपक्रम कौतुकास्पद
रोटरी जालना एक्स्पोला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भेट देऊन या एक्स्पोचे कौतुक केले. एक्स्पोमधील विविध स्टॉल्सना भेटी देऊन त्या-त्या उत्पादनांचीही लोणीकर यांनी माहिती घेतली. या एक्स्पोमध्ये जिशन इन्फ्राबिल्डने लोखंडी शेडपासून तयार केलेले शौचालय, स्वच्छ भारत मिशनचा स्वच्छतेचा संदेश देणारा स्टॉल, स्वच्छ भारत अभियानाची माहिती असलेला लायन्स क्लब आॅफ परतूरचा स्टॉल, पतंजली योग समिती जालनाचा स्टॉल अशा विविध स्टॉलची पालकमंत्री लोणीकर यांनी पाहणी केली.