कर्जत खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:09 AM2018-06-29T01:09:59+5:302018-06-29T01:10:32+5:30
कर्जत खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली. त्यांना अंबड येथील न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील कर्जत खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली. त्यांना अंबड येथील न्यायालयात हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कर्जत येथील युवक राहुल शामसिंग खोकड खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ढवळाबाई मंच्छाराम खोकड, पूनम मंच्छाराम खोकड आणि रमेश मंच्छाराम खोकड या तिन्ही आरोपींना अंबड पोलिसांनी अटक केल्याची माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांनी दिली. कर्जत येथील मयताने त्यांच्याच नात्यातील एका महिलेला गुजरातला पळवून नेल्याचा राग मनात धरत त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे कर्जत व परिसरात मोठी खळबळ उडाली होती.