बाणाची वाडी येथे शॉॅर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:48+5:302021-03-06T04:29:48+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील बाणाची वाडी शिवारातील दोन शेतकाऱ्यांचा तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ ...
आष्टी : परतूर तालुक्यातील बाणाची वाडी शिवारातील दोन शेतकाऱ्यांचा तीन एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन्ही शेतकऱ्यांचे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाणाची वाडी शिवारातील गट नंबर २३ मध्ये दशरथ गोपीनाथ बाण यांचा दीड एकर तर गट नंबर ३२ मध्ये आसाराम धोंडिबा नाईक यांचा एक एकर तीस गुंठे ऊस आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विजेचा खांब तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन तीन एकर उसाला आग लागली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचा जोर जास्त असल्याने आग विझवता आली नाही. यात दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा तलाठी के.के.वावरे यांनी पंचनामा केला आहे. यावेळी दशरथ बाण, आसाराम नाईक, रणू बाण, भागवत घांडगे, अशोक बाण, बंडू बाण, अमोल तोडेकर, मिलिंद बाण, मोहन बाण यांची उपस्थिती होती. सोपारा, बाणाची वाडी शिवारात मागील दोन महिन्यात चार शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती तलाठी के.के.वावरे यांनी केली.
महावितरणच्या हलगर्जीचा फटका
परिसरात महावितरणच्या हलगर्जीमुळे आतापर्यंत चार शेतकऱ्यांचा शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी उपसरपंच मोहन बाण यांनी केली आहे.
===Photopath===
050321\05jan_12_05032021_15.jpg
===Caption===
परतूर तालुक्यातील बाणाची वाडी येथे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करताना तलाठी के.के. वावरे, उपसरपंच मोहन बाण आदी.