तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:30 AM2020-02-17T00:30:18+5:302020-02-17T00:30:27+5:30

परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरे फोडली.

Three houses were razed, cash lined with jewelry | तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोकड लंपास

तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोकड लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरे फोडली. यावेळी सात तोळे सोन्याचे, पाच तोळे चांदीचे दागिने व रोख ४४ हजार रुपये असा एकूण एक लाख एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
दैठणा येथे भारत सवने यांच्या घरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी प्रवेश केला. बंद खोलीचे कुलूप उघडून कपाटात ठेवलेले १२ ग्रामचे कानातील वेलजोडी, चार ग्रामचे कानातील दागिने, दोन ग्रॅमचे मंगळसूत्र, लहान बाळाचे कानातले पाऊण ग्रॅमचे दागिने, एक तोळा चांदीचे हातकडे व पंचवीस हजार रुपये रोख असा ६६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी सवने यांचे आई-वडील झोपलेल्या खोलीची समोरून कडी लावून घेतली होती. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या अरुणाबाई पांडे यांच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चावीने कुलूप उघडून कपाटात ठेवलेले दहा ग्रॅमची मोहनमाळ, दहा ग्रामची एकदाणी, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व रोख २१ हजार रुपये असा एकूण ६९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
गावातील गोविंद राजेभाऊ सवने हे घरात झोपलेले होते. त्यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खोलीत ठेवलेली लोखंडी पेटीतील एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, साडेआठ ग्रामची कानातील झुंबर जोड, पाच ग्राम मण्याची पोत, दोन ग्रामची नाकातील नथ, चार तोळे चांदीचे चेन व मनगट्या असा एकूण अंदाजे ३६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. गोविंद व त्यांचे आई-वडील हे तिघे एका खोलीत झोपले होते. त्यांच्याही खोलीची चोरट्यांनी कडी मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सपोनि सुभाष सानप, बीट जमादार भीमराव मुंढे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि सानप हे करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
श्वान पथक घटनास्थळी
घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना बोलाविले होते. श्वानाने घटनास्थळापासून पाचशे मीटर कुंभार पिंपळगाव रोडपर्यंत माग काढला. मात्र, त्यानंतर तेथे श्वान घुटमळले. चोरट्यांच्या शोधासाठी पथके तैनात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Three houses were razed, cash lined with jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.