काम अडविल्याने तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:56 AM2018-10-11T00:56:08+5:302018-10-11T00:56:30+5:30

भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को ते राजूर मार्गावरील बंद असलेले काम सुरू करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यास सांयकाळी शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राजूर पोलिसांत तिघाजणांविरुध्द जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three offenses for stoppage of work | काम अडविल्याने तिघांवर गुन्हा

काम अडविल्याने तिघांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देराजुरात रस्त्याचे काम अडविले : शासकीय कामात अडथळा केल्याने गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को ते राजूर मार्गावरील बंद असलेले काम सुरू करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यास सांयकाळी शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राजूर पोलिसांत तिघाजणांविरुध्द जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, कुंभारी पाटी ते देऊळगांवराजा मार्ग क्रमांंक ७५३ चे सिमेेंट कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. सदर काम चांधई एक्को ते राजूर पर्यंतचे काम शेतकºयांनी रस्त्यात जाणाºया जमीनीचा मावेजा देण्याच्या मागणीसाठी काही दिवसापासून काम रखडले होते.मंगळवारी राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शंकरराव चव्हाण हे कर्मचाºयासह सदर बंद पडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गेले होते. काम सुरूवात करीत असतांना कैलास पुंगळे, संतोष टोम्पे, नानासाहेब ढाकणे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करून कार्यकारी अभियंता चव्हाण व साक्षीदारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जयंत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून
हसनाबाद पोलिस ठाण्यात कैलास पुंगळे, संतोष टोम्पे, नानासाहेब ढाकणे यांच्यासह ईतर पाच जणाविरूध्द भा.द.वि.३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रस्त्याच्या कामावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.मात्र रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्याची मागणी शेतकºयांतून होत आहे.

Web Title: Three offenses for stoppage of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.