अपघातात बसमधील १५ प्रवासी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:14 AM2019-11-10T00:14:35+5:302019-11-10T00:15:22+5:30

विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.

Three passengers on the bus critical of the accident | अपघातात बसमधील १५ प्रवासी गंभीर

अपघातात बसमधील १५ प्रवासी गंभीर

Next
ठळक मुद्देट्रॅक्टरमुळे झाला अपघात । बस चढली तीन फूट नाल्यावर: पोलीस, नागरिकांमुळे प्रवाशांवर तातडीने उपचार; बसस्थानकासमोरील घटना

शहागड : विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलीस व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे बसमधील जखमींना वेळेत उपचार मिळाले. ही घटना शहागड येथील बसस्थानकासमोरील सर्व्हिस रोडवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
पैठण येथून ४५ प्रवासी घेऊन निघालेली गेवराई- पैठण बस (क्र.एम.एच.२०- डी.९८६३) शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहागड येथील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने शहागड बसस्थानकाच्या दिशेने येत होती. त्यावेळी मुरूम भरलेला टॅक्टर त्याच सर्व्हिस रोडवरून विरूद्ध दिशेने जात होता. सर्व्हिस रोडवर उभी वाहने, त्याबाजूने विरूद्ध दिशेने जाणारे टॅक्टर असा प्रसंग आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस पाहता पाहता बाजूला असलेल्या तीन फुट नाल्यावरी चढली. तर मुरूम भरलेल्या टॅक्टरची ट्रॉली बसला घासत बसचा पत्रा फाडत निघून गेला. या अपघातात बसचालक रमेश देवराव सिंडाम यांच्यासह सुमय्या शाकीर आतार (रा. पिंपळनेर जि. बीड), नामदेव हरी आव्हाड, शशिकला नामदेव आव्हाड (रा.पाथरवाला बु. ता.अंबड), लक्ष्मण राजप्पा धनरवाड (रा. आपेगाव ता.अंबड), देऊबाई दशरथ सानप (रा. रेवकी देवकी ता.गेवराई), चंद्रभागा नामदेव शेंडगे (धाकलगाव ता.अंबड), आश्व मधुकर कुटुंबे (रा. बागपिंपळगाव ता.गेवराई), जालिंदर बाबुराव शेंडगे (रा.धाकलगाव ता.अंबड) यांच्यासह इतर प्रवासी जखमी झाले.
बंदोबस्तावरील पोउपनि हनुमंत वारे, जमादार अखतर शेख, भास्कर आहेर, मदन गायकवाड, अजय राजपूत, गणेश बुजाडे, सामाजिक कार्यकर्ते सिराज काझी, इद्रिस शहा, दत्ता ढगे आदींनी पोलीस व्हॅन, खाजगी वाहनात, रुग्णवाहिकेत गंभीर जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान, मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
क्रेनच्या सहाय्याने बस केली रस्त्याच्या बाजूला
गेवराई - पैठण बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन फूट नाल्यावर बस चढली होती. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर बस तेथेच उभा होती. मात्र, होणारी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी तातडीने आयआरबी खासगी कंपनीच्या क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला केली.
ट्रॅक्टर घेतले ताब्यात
अपघातानंतर घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेले ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. जखमींना ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी तातडीने मदत करून दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Three passengers on the bus critical of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.