जालन्यात मौल्यवान दगडांचे उत्खनन करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 07:07 PM2018-10-20T19:07:55+5:302018-10-20T19:08:40+5:30

मानदेवूळगाव येथील बेकायदेशीररित्या मोल्यवान दगडाचे उत्तखन्न करणाऱ्या तिघांना परिविक्षाधीन पोलीस उपअधिकक्षक यांनी ताब्यात घेतले. 

Three people arrested in Jalna for quarrying precious stones | जालन्यात मौल्यवान दगडांचे उत्खनन करणाऱ्या तिघांना अटक

जालन्यात मौल्यवान दगडांचे उत्खनन करणाऱ्या तिघांना अटक

Next

जालना : तालुक्यातील मानदेवूळगाव येथील बेकायदेशीररित्या मोल्यवान दगडाचे उत्तखन्न करणाऱ्या तिघांना परिविक्षाधीन पोलीस उपअधिकक्षक यांनी ताब्यात घेतले. 

काकासाहेब रतन खिल्लारे (रा. पिरपिंपळगाव), बाबासाहेब रतन खिल्लारे (रा. पिरपिंपळगाव), जेसीबी चालक  दीपक कडुबा लोखडे (रा. सिंधीपिंपळगाव ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ९४ हजारांचा माल जप्त करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस उपअधिक्षक राहुल गायकवाड यांना खबऱ्यामार्फत मानदेवूळगाव येथील एका शेतात मौल्यवान दगडांचे उत्खनन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यावरून शुक्रवारी रात्री पोलिसांनी शेतात धाड टाकली. यावेळी आरोपीकडून ९७० किलो गारगोटी व जेसीबी असा एकूण ११ लाख ९४ रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

Web Title: Three people arrested in Jalna for quarrying precious stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.