अंकुशनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:40 AM2018-09-07T00:40:35+5:302018-09-07T00:40:50+5:30

दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली.

A thunderbolt at Ankushnagar | अंकुशनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

अंकुशनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली.
औरंगाबाद - बीड राष्ट्रीय महामार्गावर अंकुशनगर ( दिशानगरी) येथील गणेश अंकुशराव सुरासे हे कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना हे कर्मचारी असून हे रात्री गच्चीवर झोपलेले होते. त्यांना अचानक जाग आली असता समोर चार ते पाच चोरटे दिसले. यामुळे गणेश सुरासे यांनी आरडा ओरडा करून चोरट्यांनी पळवून लावण्यासाठी गच्चीवर असलेले फावडे हातात घेऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हा आरडा ओरडा ऐकून घरातील अन्य व्यक्ती जागे झाले परंतु चोरट्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला. पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी गणेश सुरासे यांच्या पत्नी जयश्री सुरासे, मुलगा गणेश सुरासे व अन्य सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. चोरट्यांना रोखण्यासाठी जयश्री सुरासे यांनी तिखटाची भुकटी चोरट्यांच्या दिशेने फेकली. परंतू, अशाही स्थितीत चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून घरातील कपाट्याच्या चाव्या घेऊन त्यातील रोख ३५ हजार रूपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण पावने तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकारामुळे सुरासे कुटुंब भयभीत झाले.
दरम्यान, चोरट्यांना रोखण्याच्या प्रयत्नात जयश्री सुरासे यांना चाकूचा वार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, परिसरातील नागरिकांना दरोड्याची माहिती मिळाली असता नागरिकांनी तेथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, चोरटयांनी त्या नागरिकांवर तुफान दगडफेक सुरू केली. रस्त्यावर येणा-या जाणा-या वाहनांवरही दगडे फेक केल्याने नेमके काय सुरू आहे हेच वाहनधारकांना समजले नाही.
चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात नागरिकांनी पुढाकार घेतला परंतू, चोरट्यांकडे धारदार शस्त्र असल्याने त्यांच्या जवळ जाणे शक्य नसल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत गावातून पोबारा केला.
दरोड्याची माहिती काही जणांनी गोंदी पोलीसांना दुरध्वनीद्वारे कळविली. माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे
कर्मचारी पो.कॉ.गणेश बुजाडे,
अंकुश दासर, योगेश दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
एकूणच गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने ग्रामीण भागात
भीतीचे वातावरण पसरले आहे.
याकडे पोलिसांनी लक्ष
घालून चोरट्यांना जेरबंद
करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: A thunderbolt at Ankushnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.