गणनेच्या वेळी तीन अस्वलांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:05 AM2019-05-21T01:05:24+5:302019-05-21T01:05:41+5:30
जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरवर्षी बुध्द पौर्णिमेच्या दिवशी प्राणीगणना करण्यात येते. यंदाही ती करण्यात आली. शनिवारी सकाळी दहा ते रविवारी सकाळी दहा असे २४ तास वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही गणना केल्याची माहिती सहायक वन सरंक्षक अधिकारी जी.एम. शिंदे यांनी दिली. जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात ही प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले.
ही गणना करण्यासाठी वनविभागाने कृत्रिम मचाण तयार केले होते. जिल्ह्यातील वनविभागाने उभालेल्या पाणवठ्यासह नैसर्गिक पाणवठ्यावर रात्री प्राण्यांची मोठी ये- जा असते. ही बाब लक्षात घेऊन जालना येथील वनक्षेत्रपाल श्रीकांत इटलोड यांच्यासह वनपाल घुगे, बुरकूले, कचलोर, राठोड आदींसह १९ वनरक्षक तसेच १२५ वनमजुरांच्या
मदतीने ही गणना करण्यात आली. ही गणना धावडा, भोकरदन, जालना, उमरी, मंठा, उस्वद, परतूर, अंबड, किनगाव, जामखेड, सिंधी काळेगाव, काजळा, बदनापूर, उज्जैनपुरी, चित्तोडा आदी गावांचा त्यात समावेश आहे.
बिबट्याचा रहिवासही ऊस पट्ट्यात आहे, परंतु शनिवारी तो दिसला नसल्याचे सांगण्यात
आले. या प्राणी गणनेत लांडगे १५०, तरस ८०, नीलगाय ४५०, काळवीट ४६०, ससे २००, मोर १७०, रानडुकर ६००, कोल्हे ६५ अशी संख्या आहे.
या प्राण्यांचे झाले दर्शन
वन्य जीव विभागाकडून करण्यात आलेल्या प्राणी गणनेच्या वेळी तीन अस्वल, नीलगाय, तरस, लांडगे, ससे, काळवीट इ.चा समावेश आहे. धावड्याच्या जंगलात बिबट्याही असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. मात्र, ते नजरेस पडले नाहीत. तीन बिबटे असल्याची माहिती आहे.