आज ‘निवेश उत्सव’ बचत व गुंतवणूक विषयी सेमिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:14 AM2019-11-16T00:14:15+5:302019-11-16T00:15:57+5:30
लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे़
जालना : लोकमत आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत व गुंतवणुकीच्या संधी संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘निवेश उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे़
म्युचुअल फंड, व्यावसायिक व्यवस्थापन, पारदर्शकता, रोकड सुलभता आणि मजबूत नियामक आराखडा यासंदर्भातील लाभाची गुंतवणूकदारांना जाणीव होण्याकरिता हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे़ पद्धतशीर गुंतवणूक, पूर्व प्रारंभ आणि चक्रवाढ व्याजातून मिळणारा लाभ, तरुण वयात उच्च शिक्षणाकरिता गुंतवणूक इत्यादीसारख्या योजनेत गुंतवणूक करत गुंतवणूकदार अतिरिक्त लाभ मिळवू शकतात़ हा एक राष्ट्रीय गुंतवणूकदार शिक्षण व जनजागृती उपक्रम आहे़
गुंतवणुकीच्या संधीसंदर्भात जनजागृती वाढविणे हे गुंतवणूकदारांच्या शैक्षणिक भूमिके चे मूळ उद्दिष्ट आहे़
‘निवेश उत्सव’ हे नागरिकांना वित्तीय गुंतवणूकसंदर्भातील निर्णय घेण्यास मार्गदर्शक ठरणार असून, त्या संदर्भातील उपलब्ध संधीबाबत त्यांच्यात जागरुकता निर्माण करणार आहे़ फक्त नागरिकांचे वित्तीय व पैशाबाबतचे ज्ञान वाढवण्यासंदर्भातील हा उपक्रम नसून तो लोकांच्या दृष्टिकोनासंदर्भातील आहे़ संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात वित्तीय साक्षरता घडवून आणण्याच्या दिशेने ठेवलेले हे एक प्रयत्नवत पाऊल आहे़
वैयक्तिक वित्तीय साक्षरता व मूलभूत वित्तीय सेवा पुरवून कुटुंबातील आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन वित्तीय सेवा प्रदान करत उत्कृष्ट जीवनमान सुधारणे, हे मूलभूत ध्येय आहे़ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे़ अधिक माहितीसाठी ९०७५०९८०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़
यांचे लाभणार मार्गदर्शन
आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे निलेश चव्हाण व गुंतवणूक तज्ज्ञ सुहास राजदेरकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तुमच्या जमा असलेल्या ठेवीची उत्कृष्ट गुंतवणूक करणे हे काही सोपे काम नाही. आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडामधील अर्थिक सल्लागारांच्या अर्थिक नियोजनावरील ‘निवेश उत्सव’मधील मार्गदर्शनाचा लाभ घ्या.