आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:44 AM2019-04-21T00:44:00+5:302019-04-21T00:44:02+5:30

प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

Today, the Lok Sabha election will stop the gun | आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण तापवले होते. या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
जालना लोकसभा मतदार संघात कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक लढविणारे रावसाहेब दानवे यांच्या विरूद्ध काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरूनच गेले तीन महिने गोंधळाचे वातावरण होते. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी दानवेंच्या विरूद्ध दोन हात करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसने २०१४ साली दानवेंना टक्कर देणाºया विलास औताडे यांनाच रिंगणात उतरविले. २०१४ मध्ये मोदी लाटेतही औताडे यांना ४ लाख ८५ हजार मते मिळाली होती. यावेळी अशी कुठलीच लाट नसल्याने औताडे हे दानवेंना चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा आहे.
वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन वेळेस जालन्यात येऊन गेले. आंबेडकरांप्रमाणेच आ. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अल्पसंख्याक समितीचे हाजी अरफाज, केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम भाईजान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप महिला मोर्चाच्या माधवी नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांनी जालना, भोकरदन, पैठण, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड येथे या नेत्यांनी हजेरी लावून आपल्याच पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करून एकमेकांवर टीकेची झोड उठवून उन्हाळ्यात आणखी राजकीय वातावरण तप्त केले होते.
दरम्यान, शनिवारी जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी वेगवेगळ््या प्रकारे संपर्क साधून निवडून देण्याचे आवाहन केले.
निवडणूक यंत्रणा सज्ज
जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन पूर्णपणे सील करण्यात आल्या असून, त्यांचा सांभाळ हा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत केला जात आहे. या निवडणुकीत जवळपास ८ हजार कर्मचारी लागणार असून, दोन हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येत आहे. - राजीव नंदकर

Web Title: Today, the Lok Sabha election will stop the gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.