नेमीनाथ जैन मंदिराचा आज शीलान्यास कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:07 AM2019-03-08T00:07:37+5:302019-03-08T00:08:01+5:30
जुना जालना भागातील कचेरी रोडवरील प्राचीन श्री नेमीनाथ जिन प्रसाद मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिराचा शीलान्यास शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
जालना : जुना जालना भागातील कचेरी रोडवरील प्राचीन श्री नेमीनाथ जिन प्रसाद मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिराचा शीलान्यास शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सौम्यप्रज्ञाजी म. सा. यांच्यासह पाच साध्वींची उपस्थिती राहणार आहे. भगवान नेमीनाथ जैन श्वेतांबर मंदिर हे प्राचीन मंदिर असून, जवळपास ४०० वर्षापूर्वीचे हे मंदिर असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. भगवान नेमीनाथ मूर्तीसह अन्य १४ मूर्ती मंदिरात आहेत. हे मंदिर पूर्णपणे गुलाबी मार्बलमध्ये बांधण्यात येणार असून, यासाठी जुना जालना भागातील श्री माळी वाणीया, गुजराती समाजा कडून मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. नेमीनाथांची मूर्ती ही जवळपास १ हजार वर्ष एवढी प्राचीन दुर्मिळ आहे. मंदिर बांधण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.