जालन्यात आजपासून महानुभाव साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:24 AM2018-12-23T01:24:17+5:302018-12-23T01:24:42+5:30
अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात रविवारी आणि सोमवारी १२ वे राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, याचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता हॉटेल बगडीयामध्ये - महदंबानगरी येथे होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात रविवारी आणि सोमवारी १२ वे राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार असून, याचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी एक वाजता हॉटेल बगडीयामध्ये - महदंबानगरी येथे होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ.राजेश टोपे हे राहणार आहेत.
सकाळी गं्रथदिडी महानुभाव दत्त मंदिरापासून होणार आहे. पूजन आ. राजेश टोपे हे करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारती महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे, मुख्य उद्घाटन सोहळा दुपारी होईल. यावेळी सांस्कृती तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचवारवंत डॉ. आ.ह. साळुंके, विधानभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कैलास गोरंट्याल, चंद्रकांत दानवे, बाळासाहेब कापरे, अजय डवगांळे, कडूभाऊ काळे, मंगला पाटील, साहित्यिक पुरूषोत्तम नागपूरे, महंत बाबूळगावर बाबा शास्त्री, महंत हंसराज खामणीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी राहणार आहे.
या दोन दिवस होणाऱ्या साहित्य मांदियाळीस जालना जिल्ह्यातील साहित्य पे्रमिंनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा स्वागताध्यक्ष आ. राजेश टोपे,महंत प्रज्ञासागर महाराज यांच्यासह संयोजन समितीतील पदाधिका-यांनी केली आहे. यावे परिसंवाद, कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारीही भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्य पे्रमींना मिळणार आहे.
दोन दिवस चालणारे हे संमेलन जालन्यात भरत असल्याने त्याचा मोठा लाभ जालना जिल्ह्यातील साहित्यप्रेमी नागरिकांना मिळाला आहे. जालना येथेही महानुभाव पंथाचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे साहित्य भरत असलेल्या परिसरास कवयत्री महदंबानगरी असे नाव दिले आहे. एकूणच या साहित्य संमेलनातून महानुभाव पंथाचे तत्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहचणार आहे.