आज म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:53 PM2018-01-31T23:53:00+5:302018-01-31T23:54:25+5:30

सैरभैर गुंतवणूकदारांसाठी निर्धास्त गुंतवणुकीची गुरुकिल्ली म्हणजे म्युच्युअल फंड. अशा या गुरुकिल्लीची सविस्तर माहिती मिळावी, या हेतूने लोकमत आणि आदित्य बिर्ला समूह यांच्या वतीने म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Today's Mutual Fund Guidance Camp | आज म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबीर

आज म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबीर

googlenewsNext

जालना : पूर्वीच्या काळी केवळ बँकांमधील मुदत ठेवी अथवा सोने, दागिन्यांपर्यंत मर्यादित असलेली गुंतवणूक आता अनेक प्रकारांनी वाढली आहे. आता मात्र गुंतवणूक बाजाराच्या या महासागरात सर्वसामान्य गुंतवणूकदार सैरभैर असतो. अशा या सैरभैर गुंतवणूकदारांसाठी निर्धास्त गुंतवणुकीची गुरुकिल्ली म्हणजे म्युच्युअल फंड. अशा या गुरुकिल्लीची सविस्तर माहिती मिळावी, या हेतूने लोकमत आणि आदित्य बिर्ला समूह यांच्या वतीने म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मधुर बॅक्वेट हॉल, मिशन हॉस्पिटलजवळ जालना येथे १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ .३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्यात बिर्ला समूहातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्रण शेअर बाजारात दिसते. काही वेळेस हा शेअर बाजार डगमगतो तर काही वेळेस खूप वाढतो. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील परतावा आकर्षक असला तरी त्यात जोखीम असतेच. ही जोखीम पत्करण्याची तयारी नसल्यानेच ‘शेअर बाजार? नको रे बाबा’, असे म्हणत सर्वसामान्य त्याकडे फिरकतच नाहीत. अशावेळी आपल्या पैशांचा ठोस विनियोग शेअर बाजारात करून आश्वासक व वाढता परतावा देणारा मार्ग हा म्युच्युअल फंड असतो.
सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदार या नात्याने शेअर बाजारात पैसे गुंतविल्यानंतर त्यातील नफा, तोटा या सर्वांची जबाबदारी ही आपली असते. म्युच्युअल फंडात मात्र फंड मॅनेजर स्वत: ही जबाबदारी स्वीकारतो. सर्व जोखीम ही आपल्या वतीने पैसा गुंतविणारा फंड मॅनेजर स्वीकारतो. त्या बदल्यात आपल्याला मात्र ठोस आश्वासक व वाढता असा परतावा मिळत असतो.
सामान्य गुंतवणूकदाराला नेमका कुठे व कसा पैसा गुंतवावा, हे समजत नाही. हा संभ्रम दूर करण्यासाठी म्युच्युअल फंडाने जन्म घेतला. आपल्याला केवळ फंड मॅनेजरला पैसे द्यायचे आहेत. त्याच्या वाढत्या परताव्याची हमी प्रत्येक म्युच्युअल फंडात असते. फंड मॅनेजर विविध क्षेत्रातील विविध कंपनीत पैसा टाकत असतो. यामुळे एखादे क्षेत्र किंवा एखाद्या कंपनीचा शेअरदर कोसळला तरी अन्य क्षेत्रातील कंपन्या चांगले काम करीत असल्यास संबंधित फंडावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात. त्यातूनच ठोस व वाढता परतावा गुंतवणूकदारांना फंड मॅनेजर देऊ शकतात. म्युच्युअल फंडासाठी मात्र असे कुठलेही बंधन नाही.
बँका, वित्त नियोजन कंपन्या, गुंतवणूक कंपन्या अशा विविध ठिकाणी याचे अर्ज उपलब्ध असतात. अशा म्युच्युअल फंडाबाबत अधिक जाणून घेण्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली आहे.
आदित्य बिर्ला समूहाच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानात म्युच्युअल फंडाबाबत अधिक जाणून घेत आपल्या गुंतवणुकीचा ठोस, सुनिश्चित व वाढता परतावा मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर हाय टी ची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९७६७२०९०७० वर संपर्क साधावा.

Web Title: Today's Mutual Fund Guidance Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.