पाच वर्षात ३६५ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:41 AM2019-04-28T00:41:16+5:302019-04-28T00:41:41+5:30
दीपक ढोले। लोकमत न्यूज नेटवर्क जालना : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह्यात ३६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा ...
दीपक ढोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह्यात ३६५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ३२४ प्रकरणांत आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर ४१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे.
लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकºयाच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागला आहे. त्यामुळे परिस्थितीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांपासून या आकडेवारीत भरच पडत असून, मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ३६५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे.
दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैर्वी आहे. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहे.
कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
वर्ष आत्महत्या केलेल्या
शेतक-यांची संख्या
२०१४ ३२
२०१५ ८३
२०१६ ७६
२०१७ ९१
२०१८ ८३