अवैध वाळू उपसा करणारा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:03 AM2019-06-18T01:03:18+5:302019-06-18T01:03:48+5:30
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो तहसीलदारांनी सोमवारी पकडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो तहसीलदारांनी सोमवारी पकडला. ही कारवाई सोमवारी सकाळी तहसीलदारांनी दुचाकीवर जाऊन केली.
गेल्या काही दिवसांपासून टाकळखोपा व वाघाळा येथील पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र वाळूची चोरी सुरु आहे. वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू नेत आहेत.
टाकळखोपा व वाघाळा येथे अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुमन मोरे यांनी मिळाली.
माहिती मिळताच त्यांनी शासकीय वाहनाचा वापर न करता दुचाकीवर जाऊन टाकळखोपा गाव गाठले.
येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा टेम्पोे क्र. (एम.एच. २१. बीएच.२२३७) पकडला. सदर वाहन सचिन दत्तराव कांगणे यांच्या मालकीचे असून, पुढील कारवाईसाठी ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार मोरे यांनी दिली.