मोकाट जनावरांमुळे शहरात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:10 AM2018-09-25T01:10:23+5:302018-09-25T01:10:29+5:30
शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावरच वापर असल्यामुळे रहदारी ठप्प होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावरच वापर असल्यामुळे रहदारी ठप्प होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ शहरात कोंडवाडा असतांनाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेला करता येत नाही.
शहरात कामानिमित्त दररोज ग्रामीण व इतर जिल्ह्यातील नागरिक येतात. त्यामुळे शहरातील सिंधी बाजार, मामा चौक, शिवाजी पुतळा, बडी सडक, कचेरी रोड, गांधी चमन, मस्तगड या परिसरात नेहमी वाहतूकीची वर्दळ असते. त्यातच शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी ठप्प होत आहे.
कितीही हॉर्न वाजले, तरी सुध्दा जनावरे रस्त्याच्या बाजूला जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याबाबत अनेकदा नगरपालिकेकडे तक्रारी सुध्दा करण्यात आल्या आहेत. मात्र उपयोग झाला नाही. याकडे मुख्यधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.