जालन्यात अवैध वाहतुक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 07:36 PM2018-10-30T19:36:45+5:302018-10-30T19:37:47+5:30
जिल्ह्यात आज एकाच वेळी कारवाईची मोहिम राबविण्यात आली.
जालना : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याभरात अवैध वाहतुक सर्रास सुरू असल्याने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पाच पथके तयार करून जालना जिल्ह्यात आज एकाच वेळी कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यात अवैध वाहतुक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सोमवारी त्यांनी जनता दरबार घेतला. यात वाहतुकीच्या संदर्भात समस्या मांडल्या होत्या. यावरुन मंगळवारी गुन्हे शाखेने पाच पथक तयार करून अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई एकाच वेळी केली. शहरातील औरंगाबाद चौफुली येथे ४ वाहने, अंबड चौफुली ३, मंठा चौफुली ३, जाफ्राबाद चौफुुली २, रामनगर, मौजपुरी २ वाहने अशा वेगवेगळ््या ठिकाणी १४ वाहनांवर कारवाई करून चालकांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. जयसिंग परदेशी, रज्जाक शेख, कमलाकर अंभोरे, कैलास करेवाड, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, टी.सी. राठोड, समाधान तेलंग्रे, सदाशिव राठोड, हिरामन फलटणकर, सोमनाथ उबाळे, विष्णु कोरडे, विलास चेके, किरण मोरे, किशोर जाधव, योगेश जगताप, रवि जाधव यांनी केली.