मतदान केंद्राध्यक्षसह मतदान अधिकाºयांना आज प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:55+5:302020-12-31T04:29:55+5:30
सेंट मेरी हायस्कूल (देऊळगाव राजा रोड, जालना) येथे दिल्या जाणाºया या प्रशिक्षणात सकाळच्या सत्रात ८५० तर दुपारच्या सत्रात ८५० ...
सेंट मेरी हायस्कूल (देऊळगाव राजा रोड, जालना) येथे दिल्या जाणाºया या प्रशिक्षणात सकाळच्या सत्रात ८५० तर दुपारच्या सत्रात ८५० प्रशिक्षणार्थिंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठरल्याप्रमाणे काटेकोरपणे निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. तहसीलदार भुजबळ, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, परिविक्षाधीन तहसीलदार शितल बंडगर, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थिंना यावेळी मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीमध्ये ७४० सदस्य निवडले जाणार असून, यासाठी १ लाख ३० हजार ६२० मतदार आहेत.
कोट
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगाने १ नियुक्त करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकाºयांना यापूर्वीच नियुक्ती आदेश पाठविलेले आहेत. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे वेळेत सेंट मेरी हायस्कूल येथे प्रशिक्षणासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, सर्वांनी कर्तव्याचे पालन करावे, यात हलगर्जी करणाºया कर्मचाºयांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
श्रीकांत भुजबळ, तहसीलदार, जालना