जालन्यात १३ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या, चार जणांना मुदतवाढ
By दिपक ढोले | Published: July 13, 2023 06:11 PM2023-07-13T18:11:49+5:302023-07-13T18:12:32+5:30
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
जालना : पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुरुवारी जिल्ह्यातील १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे, तर चारजणांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्या पोलिस दलात बदल्याचे वार सुरू आहे. पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. जवळपास १३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांची एलसीबीत, कमलाकर अंभोरे यांची उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय जालना, ए. जी. शिंदे, शिवाजी पोहार, एम. एम. सुडके, वाय. आर. पाडळे यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
तर ए. के. ढाकणे पिंक मोबाईल अंबड, विजय आहेर भोकरदन, राजू राठोड कदीम जालना, विठ्ठल केंद्रे परतूर, दिगंबर पवार तालुका जालना, बाबासाहेब खार्डे बदनापूर आणि शैलेश म्हस्के यांची सदर बाजार पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.