तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:33 AM2019-03-14T00:33:32+5:302019-03-14T00:33:52+5:30

जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या

Transfers of three Deputy Collector | तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांची निवडणुक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, या विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांची बदली रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर नांदेड येथे बदलून गेलेले ब्रजेश पाटील हे सामान्य प्रशासन विभागात रूजू होणार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून प्रशासनातील बदल्याचे सत्र सुरू असून, त्यात अप्पर जिल्हाधिकारी खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांची गंगाखेड येथे बदली झाली आहे. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती. ती आता हळूहळू भरली जात आहेत. आता रोजगार हमी विभागाला सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. हे पद आता संगीता सानप यांच्या रूपाने भरले असल्याने दुष्काळात मोठी मदत होणार आहे. राजू नंदकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार होते, तो आता हलका होणार असून, अप्पर, निवासी तसेच रोजगार हमीचा पदभार त्यांच्याकडे होता.

Web Title: Transfers of three Deputy Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.