माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:37 AM2019-09-18T00:37:26+5:302019-09-18T00:38:02+5:30

गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.

Transform information into knowledge | माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

माहितीचे रूपांतर ज्ञानात करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आज तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. क्षणात माहिती कुठेही पोहोचत आहे. तेव्हा गरज आहे ती सदर माहितीची तंत्राच्या साहायाने ज्ञानात रूपांतर करण्याची, असे प्रतिपादन डॉ. जितेंद्र अहिरराव यांनी केले.
चेतना जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करता ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुभाष देविदान हे होते. तर अ‍ॅड. सीताराम धन्नावत, बालकिशन शर्मा, अशोक हुरगट, सुदामराव जडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अहिरराव यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाच्या मानवी जिवनावर झालेले परिणाम’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज पैसापेक्षा गुणवत्तेला महत्व आहे. जागतिकरणाचा वेग वाढत आहे. ज्ञानावर आधारित समाजरचनेस सुरुवात होत आहे. हरीतक्रांती, धवलक्रांतीनंतर आता आपल्या देशात महिती तंत्रज्ञानाची क्रांती घडत आहे. आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे अनेक फायदे होत आहे. ताटकळत थांबावे लागत नाही. आज तंत्रज्ञानामुळे प्राचीन शब्दाचा शोध घेऊन संकलन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ओमप्रकाश धानवाल यांनी पाहुण्याचा परिचय दिला. तर लक्ष्मीकांत कंकाळ, गोविंद प्रसाद बियाणी व जगदीश जोशी यांनी प्रकल्प राबविला. यावेळी अशोक हुरगट, सचिव अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांच्यासह ज्येष्ठांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Transform information into knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.