एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:55 AM2024-09-21T04:55:06+5:302024-09-21T04:56:36+5:30

गेवराईहून जालन्याकडे बस निघाली होती. बस शहापूरजवळ आली असता अंबडहून मोसंबी घेऊन येणाऱ्या ट्रकबरोबर समोरासमोर धडक झाली. 

Truck collides with ST bus, six killed; 20 people were seriously injured, three women died | एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला

एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला

अंबड/वडीगोद्री (जि. जालना) :  जालना-वडीगोद्री मार्गावर शहापूरजवळील वळणावर शुक्रवारी सकाळी एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.

गेवराईहून जालन्याकडे बस निघाली होती. बस शहापूरजवळ आली असता अंबडहून मोसंबी घेऊन येणाऱ्या ट्रकबरोबर समोरासमोर धडक झाली.  बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णवाहिकांद्वारे अंबड व जालना येथील रुग्णालयात दाखल केले.

जालना-वडीगोद्री मार्गावरील शहापूरजवळील वळणावर बस आणि ट्रकच्या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांची झालेली अवस्था.

दुचाकीला दिली हुलकावणी : अंबडहून बीडकडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशरचालकाने झिरपी फाट्यावर एका दुचाकीला हुलकावणी दिली होती.  या दरम्यान दुचाकीवरील पोते खाली पडल्याने आयशर चालकाने गाडी भरधाव चालवली. दोन किलोमीटरवर जात नाही तोच हा भीषण अपघात झाल्याचे अन्य वाहनधारकांनी सांगितले.

Web Title: Truck collides with ST bus, six killed; 20 people were seriously injured, three women died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.