ट्रकने चिरडले, दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:59 PM2017-11-30T23:59:33+5:302017-11-30T23:59:35+5:30
अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली. ...
अंबड : दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री जालना-अंबड रस्त्यावर घडली.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास अंबड शहरातील पठाण मोहल्ला येथील शेख फेरोज शेख शमशुद्दीन (३२) व अय्याज खान महेमूद खान पठाण (३०) आपल्या दुचाकीने (एम.एच.२१ -५८७०) जालन्याहून अंबडकडे येत होते. आठ वाजेच्या सुमारास पाठीमागून येणाºया कारने (एमएच.२० सीएस.७४२०) या दुचाकीस मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. त्याच वेळी समोरून येणाºया ट्रकने दोघांना चिरडले. या अपघातात शेख फेरोज जागीच ठार झाला तर अय्याज खान हा गंभीर जखमी झाला आहे. अय्याज खान याला अंबड उपजिल्हा रुग्णालयातून प्रारंभी जालना व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत दोघांवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपतींना निवेदन....
जालना - अंबड - वडीगोद्री रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारी झालेल्या अपघातातील मयत अयाज खान यांचे वडील महेमूद खान पठाण यांनी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिल्हाधिकाºयांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली. मयताच्या वारसांना १५ लाखांची मदत करावी, वारसांना सरकारी सेवेत सामील करावे, जालना - अंबड रस्त्याची चौपदरीकरण करण्यात यावे या मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे.