गुटख्याने भरलेला ट्रक पेटला की पेटवला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:40 AM2018-03-21T00:40:08+5:302018-03-21T11:41:42+5:30

औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव (ता.अंबड) फाट्याजवळ सागर कंपनीचा गुटखा, पानमसाल्याचा ट्रक पेटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ट्रक पेटला की पोलीस कारवाईच्या भीतीने चालक-मालकाने स्वत: च पेटवला याची चर्चा परिसरात सुरू आहे.

The truck filled with gutka blazed? | गुटख्याने भरलेला ट्रक पेटला की पेटवला ?

गुटख्याने भरलेला ट्रक पेटला की पेटवला ?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव (ता.अंबड) फाट्याजवळ सागर कंपनीचा गुटखा, पानमसाल्याचा ट्रक पेटल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. ट्रक पेटला की पोलीस कारवाईच्या भीतीने चालक-मालकाने स्वत: च पेटवला याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या ट्रक सागर गुटखा कंपनीचा ट्रकमध्ये (एमएच २५ यु. २९९१) सुमारे एक कोटीच्या आसपास गुटखा होता. ट्रक बीडकडून औरंगबाादकडे जात होता. बीडकडून औरंगाबादकडे जात होता. डोणगाव फाट्याजवळ या ट्रकला आग लागल्याचे काहींनी पाहिले. माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने, उपनिरीक्षक विकास कोकाटे, हे घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली. ट्रक उस्मानाबाद पासिंगचा असल्यामुळे पोलिसांनी पंचनामा करुन उस्मानाबाद प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तात्काळ पत्र पाठवून या ट्रकचा मालकाची माहिती मागवली. ट्रकचा मालक व विक्रेत्याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे परजने यांनी सांगितले. सोमवारीच अंबड पोलिसांनी अकरा लाखांच्या गुटख्यासह ट्रक पकडला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे पुन्हा गुटख्याची ट्रक पेटल्याच्या घटनेने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

Web Title: The truck filled with gutka blazed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.