महिलांच्या तक्रारींसाठी भरोसा सेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:07 AM2020-03-08T00:07:31+5:302020-03-08T00:07:33+5:30
शहरी, ग्रामीण भागातील महिलांसह मुलींच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरी, ग्रामीण भागातील महिलांसह मुलींच्या तक्रारींचे निरसण करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयात सुरू होणाऱ्या या सेलचे जागतिक महिला दिनी रविवारी कामकाज सुरू होणार आहे.
महिलांच्या कौटुंबिक तक्रारी सोडविण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलांतर्गत विशेष महिला सुरक्षा कक्ष सुरू आहे. या कक्षात महिलेच्या सासर- माहेरच्या मंडळींचे समुपदेशन करून मोडकळीस आलेला संसारात पुन्हा हस्य फुलविण्याचे काम केले जात आहे. पोलीस विभागाने यापुढे एक पाऊल टाकत आता महिलांच्या कौटुंबिकच नव्हे तर इतर तक्रारींचे निरसण करण्यासाठी भरोसा सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांची होणारी भांडणे व इतर तक्रारींची या सेलमध्ये समुपदेशनाने सोडवणूक केली जाणार आहे. शिवाय शालेय मुलींच्या तक्रारीही या कक्षात घेतल्या जाणार आहेत. जालना येथे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलचे कामकाज पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपाधीक्षक (गृह) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा कक्षाच्या पोउपनि एस. बी. राठोड व त्यांची टीम या पाहणार आहे. या सेलचे रविवारी जागतिक महिला दिनी उद्घाटन होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, कारागृह अधीक्षक अरूणा मुगूटराव, स्त्रीरोग तज्ज्ञ अश्विनी मिसाळ, प्रा. डॉ. सीमा निकाळजे, अॅड. आर. एस. ओहळ, अनया अग्रवाल यांची उपस्थिती राहणार आहे.
अशी राहणार सुविधा
या भरोसा सेलमध्ये पोलीस अधिकारी- कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, कायदे तज्ज्ञ, समुपदेशक आदी कार्यरत राहणार आहेत.
भारोसा सेलमध्ये एखादी महिला, मुलगी तक्रार घेऊन आली आणि तिला निवाºयाची गरज असेल तर संबंधित तक्रारदारास तात्पुरत्या स्वरूपात निवाराही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.