क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:00 AM2018-05-30T01:00:05+5:302018-05-30T01:00:05+5:30
जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे.
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत या रोगाची लक्षणे असणाºया व्यक्तीचे रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. जनजागृतीमुळे मागील काही वर्षात क्षयरोगाची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अनेकदा हे रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेतात. मात्र, केंद्रशासनाने या रुग्णांची नोंद शासनस्तराव ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. फुफुसाचा क्षयरोग असणारे बहुतांश रुग्ण त्रासाकडे दुर्लक्ष करून डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात, असे आढळून आल्यानंतर क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून निकषांनुसार निवडलेल्या कार्यक्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. विशेषत: झोपडपट्टी भाग, कारागृह कैदी, अनाथायले, बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, दुर्गम गावे, एचआयव्ही अति जोखमीचा भाग, अती कुपोषित भागांत या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देऊन क्षयरोगांच्या लक्षणांची माहिती देणे, संशास्पद रुग्ण आढळल्यास त्यांच्या थुंकीचे नमुने घेणे तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नवीन क्षयरुग्ण आढळल्यास त्यांच्यावर वर्गवारीनुसार डॉट्स उपचार जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. ए.जी. सोळंके यांनी दिली.