नाफेडकडून तुरीची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:39+5:302020-12-30T04:40:39+5:30
देऊळगाव राजा : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. ...
देऊळगाव राजा : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तुरीला ६ हजार रूपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली असून, जिल्ह्यात ९ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
यात बुलडाणा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या, दे. राजा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या, लोणार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, मेहकर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या, शेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्या, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सि. राजा आणि माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे. राजा यांचा समावेश आहे. या खरेदी केंद्रांवर तुरीची खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. तरी शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रांवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी केले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा ऑनलाईन पीक पेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.