बारा बलुतेदारांनी मोर्चात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:02+5:302021-01-21T04:29:02+5:30

दानकुंवर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन जालना : शहरातील दानकुंवर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले ...

Twelve balutedars should join the march | बारा बलुतेदारांनी मोर्चात सहभागी व्हावे

बारा बलुतेदारांनी मोर्चात सहभागी व्हावे

Next

दानकुंवर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कवी संमेलन

जालना : शहरातील दानकुंवर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. विजय नागोरी, उपप्राचार्य डॉ. विद्या पटवारी, डॉ. जितेंद्र अहिरराव यांची उपस्थिती होती. प्रारंभी पायल भारसाकळे व ग्रुपने स्वागत गीत सादर केले. यावेळी उपस्थित अनेकांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमास डॉ. बी. जी. श्रीरामे, डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. सुधाकर वाघ, डॉ. स्वाती महाजन, आदींची उपस्थिती होती.

रोषणगावात परिवर्तन पॅनेलचा बोलबाला

रोषणगाव : बदनापूर तालुक्यातील रोषणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. रोषणगाव येथील ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ९ आहे. यात ग्रामविकास पॅनेलचे ५, तर तिरंगा ग्रामविकास पॅनेलचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामविकास पॅनेलचे बहुमत सिद्ध झाल्याबद्दल पॅनेलप्रमुख कासम कुरेशी यांच्यासह उमेदवारांचा बदनापूर येथील नगरसेवक मुद्दतसीर बाबा मिय्या काझी यांनी गौरव केला.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मागणी

जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Twelve balutedars should join the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.