जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 07:17 PM2018-11-13T19:17:07+5:302018-11-13T19:17:55+5:30

 संजयसिंग कृष्णासिंग कबुली, अर्जुनसिंग छगनसिंग भोंड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Two accused detained in Jalna; Local crime branch action | जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

जालन्यात घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

Next

जालना : जाफराबाद येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी दोने आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  संजयसिंग कृष्णासिंग कबुली, अर्जुनसिंग छगनसिंग भोंड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांना खबऱ्या मार्फेत माहिती मिळाली की, १० नोव्हेंबर येथे चार दुकानाचे शटर तोडून घरफोडी संजयसिंग भादा यांनी केली. या माहितीवरून त्यांनी संजयसिंग भादा यांचा घेऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्हा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड व करणसिंग छगनसिंग भोंड यांच्यासह केल्याची कबूली दिली. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेली कार (क्रं.एम. एच. २० वाय ८५५९) त्याच्या ताब्यात मिळून आली.  कारची पाहणी केली असता, कारमध्ये ६५ हजार रुपये किंमतीचे १५५० ग्रॅम वजनी चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडून  चांदीच्या दागीने व कार असा एकूण २ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  त्यानंतर त्याचा साथीदार अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून नगदी ७हजार ५०० रुपये मिळून आले.  

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,  अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, अंबादास  साबळे, विनोद गडदे, सागर बाविस्कर, रंजित वैराळ, सचिन चौधरी, विलास चेके, परमेश्वर धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांनी केली.

Web Title: Two accused detained in Jalna; Local crime branch action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.