कामगार पाल्यांसाठी अडीच कोटींची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:45 AM2019-08-07T00:45:48+5:302019-08-07T00:46:19+5:30
बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. यातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठीची मदत होत आहे.
बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारासाठी विविध योजना राबविण्या येते. यामध्ये बांधकाम कामगार, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकुलीन यंत्र दुरुस्ती, कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती यासह २८ प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आर्थिक परिस्थिमुळे बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होवू नये म्हणून शासनाच्या कामगार मंडळाकडून कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी शिष्यृवृत्ती स्वरुपात काही रक्कम देण्यात येते. जिल्ह्यात सध्या ६० हजार कामगारांची नोंद आहे. त्यापैकी ३६ हजार कामगार हयात आहेत. मात्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध चांगल्या योजनांची जनजागृतीच्या अभावामुळे कामगारांना आपल्या हक्काच्या योजनांची माहिती होत नाही. यामुळे अनेक कामगार विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. जिल्ह्यात २०११ पासून आॅगस्ट २०१९ पर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी २ हजार ६६१ कामगार पात्र ठरले आहेत. त्यांना २ कोटी ६८ लाख १३ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.