बांधकामाचे साहित्य चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; चौकशीत आठ गुन्हे उघडकीस
By दिपक ढोले | Published: August 8, 2023 06:59 PM2023-08-08T18:59:51+5:302023-08-08T19:00:04+5:30
साथीदारांच्या मदतीने जिल्हाभरात बांधकाम साहित्य चोरल्याची कबुली.
जालना : शहरासह जिल्हाभरातून साहित्य चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सचिनसिंग बऱ्हामसिंग कलाणी, ज्वालासिंग रामसिंग कलाणी (४५ रा. गुरूगोविंदसिंग नगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याबरोबरच आठ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.
तालुका ठाणे, सदर बाजार आणि चंदनझिरा ठाण्याच्या हद्दीतून सचिनसिंग कलाणी याने साहित्य चोरी केल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने ज्वालासिंग कलाणी व अन्य दोन साथीदारांच्या मदतीने जिल्हाभरात बांधकाम साहित्य चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ज्वालासिंगला ही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी सळ्या, जॅक पाईप, लोखंडी प्लेट असा एकूण १ लाख ६३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. खांडेकर, पोउपनि. प्रमोद बाेंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सतीश श्रीवास, कैलास चेके, योगेश सहाने, रमेश पैठणे, सौरभ मुळे यांनी केली आहे.