दोन मुन्नाभार्इंविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:47 AM2017-12-30T00:47:41+5:302017-12-30T00:47:53+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला

Two cases filed against bogus doctors | दोन मुन्नाभार्इंविरुद्ध गुन्हे दाखल

दोन मुन्नाभार्इंविरुद्ध गुन्हे दाखल

googlenewsNext

घनसावंगी : वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाºया दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी विकास रोडे, पंचायत समितीचे धनराज साळुंके, एम. टी. पाटील यांनी सदरील कारवाई केली. राजाटाकळी येथील मूळ रहिवासी व सध्या नाथनगर येथे वास्तव्यास असलेला युवराज गुलाब डेंगळे (२९) तसेच मच्ंिछद्रनाथ चिंचोली येथील अमोल जगदीश जागृत (२९) हे पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना पथकाला आढळून आले. दोघांच्या खाजगी क्लिनिकवर पथकाने गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे औषधी व वैद्यकीय साहित्य आढळून आले. म. चिंचोली येथे धन्वंतरी क्लिनिकमध्ये अमोल जागृत याच्याकडे बीएएमएस ही पदवी असताना अ‍ॅलोपॅथीची औषधी बाळगून उपचार करीत असल्याचे आढळून आले. नाथनगर येथे देखील डेंगले याच्याकडे औषधी आढळून आली आहे. या कारवाईमुळे अनेक बोगस डॉक्टरांनी पोबारा केला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरुच राहणार असल्याचे डॉ. विलास रोडे यांनी सांगितले.
याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two cases filed against bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.