‘नायजेरियन फ्रॉड’ करणारे दोघे गुन्हे शाखेने उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:36 AM2018-02-09T00:36:53+5:302018-02-09T00:37:10+5:30

ओ.एल.एक्स. या संकेतस्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाईन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा ‘नायजेरियन फ्रॉड’चा प्र्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

The two criminals arrested for 'Nigerian fraud' | ‘नायजेरियन फ्रॉड’ करणारे दोघे गुन्हे शाखेने उचलले

‘नायजेरियन फ्रॉड’ करणारे दोघे गुन्हे शाखेने उचलले

googlenewsNext

जालना : ओ.एल.एक्स. या संकेतस्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाईन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा ‘नायजेरियन फ्रॉड’चा प्र्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
मुरसलीम फजरू खान (२३, रा.घोघोर, भरतपूर, राजस्थान) व सद्दाम खान कासू खान (२३,झेंजपुरी, भरतपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जालना पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी अभिषेक शिरगुळे याने ओ.एल.एक्स या संकेतस्थळावर आयफोन खरेदी केला होता. मोबाईल विक्री करणा-यास त्यांनी पेटीएमद्वारे साडेबारा हजार रुपये दिले होते. विक्री करणा-याने शिरगुळे यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांचे शासकीय ओळखपत्र व आधारकार्ड व्हॉट्सअ‍ॅपवर मागवून घेतले. पैसे देऊनही मोबाईल मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क केला असता, त्याने मोबाईल पाठविल्याचे सांगितले. शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्या आधारे ओएलएक्सवर बनावट जाहिरात दिली. त्यामुळे शिरगुळे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वस्तू मिळाली नसल्याबाबत फोन आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार सायबर सेल तथा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना सांगितला. सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला. तपासात संशयितांची सर्व माहिती मिळविल्यानंतर शिरगुळे यांच्या ओळखपत्राच्याआधारे इतरांची फसवणूक झाल्याचे समोर आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मूळ गावी सायबर सेलचे पथक पाठविण्यात आले. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर पथकाने झेंजपुरी येथे काही दिवस थांबून गुप्तपणे माहिती मिळवली. पाच फेबु्रवारीला पोलिसांनी दोघांना उचलून जालन्यात आणले. चौकशीत त्यांनी अशाच पद्धतीने इतर राज्यांतही अनेकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, दहा सीमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी बी.डी. बोरसे, हेड कॉन्स्टेबल भालचंद्र गिरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश गोफणे, शिवप्रसाद एखंडे, शेख इरफान शेख, योगेश सहाणे, संगीता चव्हाण, अर्चना आधे यांनी ही कारवाई केली.
------------
नायजेरियन अधिक सक्रिय
पोलीस रेकॉर्डनुसार अशा पद्धतीने आॅनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार नायजेरियासह इराणी हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे अशा फसवणुकीस नायजेरियन फ्रॉड म्हटले जाते, असे पोलीस निरीक्षक गौर यांनी सांगितले.

Web Title: The two criminals arrested for 'Nigerian fraud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.