विहिरीत पडून दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:17 AM2019-02-19T01:17:09+5:302019-02-19T01:17:34+5:30
क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.
तालुक्यातील वाकुळणी शिवारातील गट नं २०५ मधे आज सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या विहिरीचे काम सुरू होते. पाणी पिण्यासाठी विहिरीतून वर आलेले कर्मचारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास के्रनच्या मदतीने पुन्हा विहिरीत काम करण्यासाठी जात असताना अचानक के्रनचा केबल तुटल्याने तिन्ही मजूर ७० फूट खोल असलेल्या विहिरीत पडले. विहिरीचे खोदकाम सुरू असल्याने विहिरीत सर्वत्र दगड पसरले होते, या दगडांचा डोक्याला जबर मार लागून त्यात नवनाथ भाऊसाहेब चौधरी (३२) , मच्छिंद्र देवीदास चौधरी (२८, दोघे रा. माळेगाव ता बदनापूर) यांचा मृत्यू झाला. आहे. तर विष्णू बबन शिनगारे हे गंभीर जखमी आहेत. जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.