दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर

By दिपक ढोले  | Published: August 26, 2023 05:16 PM2023-08-26T17:16:47+5:302023-08-26T17:17:13+5:30

दोघेही बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

Two friends drowned in the Kundalika river, the families of both are in the open as the housekeepers are gone | दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर

दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर

googlenewsNext

जालना : शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे शनिवारी दुपारी कुंडलिका नदीतील एका खड्ड्यात पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना जालना शहरातील गांधीनगर परिसरात घडली. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश सुनील पाटोळे (२४), मुकेश देविदास पाखरे (२८ दोघे रा. गांधीनगर) अशी मयतांची नावे आहेत. 

आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे हे दोघे मित्र आहेत. ते बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या दोघांचेही लग्न झालेले आहेत. त्यातील मुकेश यांना चार मुले आहेत. ते दररोज सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडतात. शुक्रवारी सकाळीही बिगारी कामासाठी चाललो, असे सांगून दोघेही घरातून निघून गेले. सायंकाळपर्यंत ते आलेच नाही. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मिळून आले नाहीत. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह कुंडलिका नदीपात्रात असलेल्या एका खड्ड्यात आढळून आले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली.

सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Two friends drowned in the Kundalika river, the families of both are in the open as the housekeepers are gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.