वाहनाच्या धडकेत एक ठार दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:25 AM2019-02-16T00:25:44+5:302019-02-16T00:26:01+5:30
भोकरदन- जालना रस्त्यावरील बरंजळा पाटीजवळ अज्ञात टिप्परने दोन दुचाकीस्वारांस धडक दिली. यात एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन- जालना रस्त्यावरील बरंजळा पाटीजवळ अज्ञात टिप्परने दोन दुचाकीस्वारांस धडक दिली. यात एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या दरम्यान घडली आहे.
राजू प्रेमसिंग बारवाल (रा. जुनाना, ता. जि. बुलडाणा) असे मयताचे नाव आहे. तर अनिल मगरे, अमैल दाभाडे (दोघेही रा. राजूर) अशी जखमींची नावे आहेत.
मयत राजू बारवाल हा दुचाकी एम. एच. २८, डी. सी. ५५४३ यावरून राजूरकडून भोकरदनकडे येत होता. तर अनिल मगरे व अमैल दाभाडे हे एम. एच. २१ एटी. ८६८० या दुचाकीवरून राजूरकडे येत होते. दरम्यान या दोन्ही दुचाकीला अज्ञात टिप्परने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख कैलास पुंगळे व ज्ञानेश्वर पुंगळे यांच्याहस नागरिकांनी जखमींना जालना येथे उपचारासाठी पाठविले. घटनास्थळी पो. उप. नि. अमन सिरसाठ व भोकरदन पोलीस कर्मचारी यांनी भेट देवून पंचनामा केला.
पुतण्याला चिरडले
या अपघातातील मयत राजू हा एका गाडीवर तर त्याचे चुलत भाऊ गोपाल बारवाल व काकू जमनाबाई या दुसऱ्या गाडीवर होते दरम्यान अज्ञात टिप्पर ने दोन दुचाकीला ठोस दिली त्यावेळी जमनबाई व भाऊ गोपाल यांच्या समोर पुतण्याला चिरडले.