गोव्यातील दोन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:14 AM2018-01-12T00:14:55+5:302018-01-12T00:15:12+5:30
केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानी असलेली दोन लाख रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली
जालना : केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानी असलेली दोन लाख रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात दीव-दमणसह गोवा राज्यातील दारू महाराष्ट्राच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे काही जण बाहेर राज्यात विक्रीस परवानी असलेली दारू स्वस्त दरात आणून आपल्याकडे विक्री करीत आहेत. अशाच पद्धतीने गोवा राज्यातील दारू वालसा वडाळा शिवारात विक्रीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून वेगवेगळ्या ब्रँडचे दारूचे वीस बॉक्स जप्त केले. बाजारात या मद्याची किंमत एक लाख ९२ हजार आहे. या प्रकरणी पोलिसांनी वालसा वडाळा येथील योगेश विलास पोटे यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहायक निरीक्षक विश्वनाथ भिसे, गोकळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, समाधान तेलंग्रे, विनोद गडदे, विलास चेके, सचिन चौधरी, विष्णू कोरडे यांनी ही कारवाई केली.