वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:08 AM2019-04-02T00:08:07+5:302019-04-02T00:16:17+5:30

शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टँकर १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला आहे.

 Two people killed in different accidents | वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार

वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार

Next

हिंगोली : शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टँकर १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला आहे.
शहरालगतच्या खटकाळी बायपास भागात नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. सोमवारी दुपारी १२.३० वाजता वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि टँकर या दोन्ही वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. अपघात एवढा मोठा होता की, मयत वाहनचालक ३० ते ४० फूट फरफरटत गेल्याने त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रूग्ण्वाहिकेद्वारे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मयताची ओळख पटली नसून नसून ती पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
घटनास्थळी हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तत्काळ पोहचले. यावेळी वाहतूक सुरळीत करून काही वेळात रस्ता मोकळा करून दिला. घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार
कनेरगाव नाका, जि. हिंगोली : कनेरगाव हिंगोली राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च च्या रात्री घडली आहे. रात्री अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. सकाळी घटना लक्षात आली. हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील पांडुरंग किसन जाधव (३५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मयत पांडुरंग जाधव हे कनेरगाव नाका येथील बुलडाणा अर्बन बँकेत गोदाम लिपिक या पदावर कार्यरत होते. ३१ मार्च रोजी बँकेचे कामकाज आटोपून रात्री १० वाजता दुचाकी क्र. एम.एच. ३८ एल. ६८४० ने गावाकडे निघाले. कनेरगाव-फाळेगावच्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या अज्ञात वहानाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने पांडुरंग जाधव हे रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा रात्रीच मृत्यू झाला. अपघातातील दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मृतदेह रात्रभर बाजूच्या खड्ड्यामध्ये रात्रभर पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मयताची ओळख पटविली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंगोली ग्रामीणचे पोउपनि पोटे, बीट जमादार राजेश ठोके, बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक संचेती, कनेरगाव नाका शाखेचे तोष्णीवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title:  Two people killed in different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.