दोन सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:52 AM2018-05-15T00:52:48+5:302018-05-15T00:52:48+5:30
दोन सैराट जोडप्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यातील दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारवरून दोन्ही तरुणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील दोन सैराट जोडप्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यातील दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने पालकांच्या तक्रारवरून दोन्ही तरुणांविरोधात परतूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बामणी येथील संशयित रामा देवरे याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीस सात मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून फूस पळूवन नेले. विशेष म्हणजे या तरुणीचा १२ मे रोजी विवाह ठरला होता. तर दुसरे सैराट जोडपे हे परतूर शहरातील आहे. पारधीवाडा येथील संशयित आशोक चव्हाण यानेही सात मे रोजी एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळूवन नेले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीस आठवडाभरापासून त्यांचा शोध घेत होते. सोमवारी दोन्ही जोडप्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन परतूर पोलीस ठाण्यात आणले. मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही संशयित तरुणांवर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तर मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक नंदकुमार अंतराप हे करीत आहेत.