‘फन रनर्स’च्या मॅरेथॉनमध्ये राज्यातून दोन हजार धावपटूंचा राहणार सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:42 IST2019-11-07T00:42:12+5:302019-11-07T00:42:39+5:30
येथील फन रनर्स ग्रुपच्या वतीने यंदाही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे

‘फन रनर्स’च्या मॅरेथॉनमध्ये राज्यातून दोन हजार धावपटूंचा राहणार सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील फन रनर्स ग्रुपच्या वतीने यंदाही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी सकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. यात ५, १० आणि २१ किलोमीटर असे अंतर राहणार आहे. यासाठी मुंबईतील १२५ जणांचा फिट रायझर्स ग्रुप सहभागी होणार असून, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती योवळी देण्यात आली.
मंठा चौफुली जवळील बिज सिडस्च्या मैदानावरून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी धावपटूंना इलेक्ट्रॉनिक चीप देण्यासह अन्य गरजेच्या सािहत्याचे किट देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसह सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र तसेच पदकांचे वितरण करण्यात येणार आहे. येथील फन रनर्स ग्रुपतर्फे यंदाचे हे मॅरथॉन आयोजनाचे तिसरे वर्ष आहे. या ग्रुपमध्ये शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. आरोग्या संदर्भात जागृती व्हावी या मॅरेथॉनामागिल प्रमुख उद्देश असल्याचे योवळी संयोजकांनी सांगितले.
बुधवारी सकाळी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपजून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी नितिन नार्वेकर, उपमुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. योवळी जिल्हा प्रशासनाचेही मोठे सहकार्य मिळत असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.