दुचाकी लंपास : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:30 AM2021-04-24T04:30:21+5:302021-04-24T04:30:21+5:30
मोसंबीची २२ झाडे जळाली ; गुन्हा दाखल जालना : शेतातील बांधाच्या कारणावरून दोघांनी मोसंबीची २२ झाडे जळून १ ...
मोसंबीची २२ झाडे जळाली ; गुन्हा दाखल
जालना : शेतातील बांधाच्या कारणावरून दोघांनी मोसंबीची २२ झाडे जळून १ लाख रूपयांचे नुकसान केल्याची घटना अंबड तालुक्यातील शेवगा येथे ४ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी संजय खोरे यांच्या फिर्यादीवरून संशयित शहादेव क्षिरसागर व एक महिला (दोघे रा. हरतखेडा ता. अंबड) यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल
जालना : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही वडीगोद्री येथे मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या एकाविरुध्द कारवाई करण्यात आली. या प्रकरणी महेश बालासाहेब तोटे यांच्या फिर्यादीवरून विकास सुभाष आटोळे (रा. वडीगोद्री, ता. अंबड) याच्याविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोह. कंटुले हे करीत आहेत.
विजेच्या खांबाला वाहन धडकले
जालना : भरधाव वेगाने वाहन चालवून विजेच्या खांबाला जोराची धडक दिल्याची घटना बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी ते केळीगव्हाण सब स्टेशनच्या पाठीमागे घडली. यात चार विजेचे खांब पडून ६२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी व्यंकटेश पाकाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञातविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना घुसिंगे हे करीत आहेत.
अवैधरित्या दारूची विक्री करणारा अटकेत
जालना : घनसावंगी येथे अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यास घनसावंगी पोलिसांनी २२ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. सुदाम राजेश मिठे (रा. रामगव्हाण ता. घनसावंगी) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४ हजार ४६ रूपयांच्या ९७ देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास पोना गोल्डे हे करीत आहेत.
अवैध दारूची विक्री : एका विरुध्द गुन्हा दाखल
जालना :अंबड शहरातील जळगावकर नाट्यगृहासमोर अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. अशोक विठ्ठल गायकवाड (रा. तिर्थपुरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोना. चव्हाण हे करीत आहेत.